"डॉ. आंबेडकरांचे स्नेही दत्तोबा पोवार" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

कोल्हापूरचे सुधीर पोवार यांनी "डॉ. आंबेडकरांचे स्नेही दत्तोबा पोवार" हा ग्रंथ लिहून पूर्ण केला होता. जेव्हा तो माझ्याकडे प्रकाशनासाठी आला तेव्हा आमच्यात बातचीत सुरु झाली. या पुस्तकाच्या पाचशे प्रति मी तुम्हाला खवपून देण्यास मदत करेन असे त्यांनी मला वचन दिले होते. डॉ. आंबेडकरांची आणि शाहू महाराजांची भेट दत्तोबा पोवार यांनीच कशी घडवून आणली, यावर सविस्तर चर्चा त्यांनी माझ्याशी केली.ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. (पण ही मैत्री अल्पशी ठरली.) ओळखी दरम्यान मी त्यांच्याकडून, "बाबांचे स्मरण"  म. भि. चिटणीसांची विमलकीर्ती यांनी घेतलेली मुलाखत लहान पुस्तिकेद्वारे प्रसिद्ध झाली होती, ती पुस्तिका आणि जनतेच्या एका विशेष अंकाची (ऑक्टोबर १९५४) मागणी केली होती. ते दोन्ही त्यांच्याकडे होते. त्यांनी ताबडतोब त्याच्या कॉपीज करून त्यांनी मला पाठवूनही दिल्या. विजय सुरवाडे आणि मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यंगचित्रांवर काम करत आहे, याची माहिती त्यांना दिली तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे असलेले दोन व्यंगचित्रे मला पाठवून दिली होती. आंबेडकरकालीन नियतकालिकांवर मी काम करत असल्याची त्यांना कल्पना दिली होती. त्यांच्याकडून मला संशोधनात कार्यात मदत हवी होती. त्यांच्याकडील काही संदर्भ हवे होते. ते मला सर्वतोपरी मदत करायला तयार होते. 

कोल्हापूरचे दत्तोबा पोवार यांचे हे चरित्र असून त्यात डॉ. आंबेडकर आणि त्यांचा पत्रव्यवहार आहे.

राजर्षी शाहू गौरव ग्रंथातील शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांची काही पत्रे बघून मला कल्पना सुचली की छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समग्र पत्रव्यवहार एकत्र करून प्रसिद्ध करावा. ते काम सुधीर पोवार पूर्ण करू शकतील असा मला विश्वास वाटल्याने मी त्यांना ते काम पूर्ण कराल का अशी पृच्छा केली. ते आनंदाने तयार झाले. अवघ्या एक हप्त्यानंतर त्यांनी मला पत्र पाठवून "शाहू-आंबेडकर पत्रव्यवहार" पूर्ण केल्याचे सांगितले. नियोजित ठरल्याप्रमाणे "डॉ. आंबेडकरांचे स्नेही दत्तोबा पोवार" या ग्रंथ प्रकाशनाची तयारी  आम्ही करत होतो. ग्रंथाची प्रुफे त्यांनी दोनदा तपासली होती. मी लहान असलो तरी त्यांचे बोलणे माझ्याशी नेहमी विनम्रपणाचे असायचे. आमचे बोलणे फोनवर व्हायचे. पत्रव्यवहार तीन-चार वेळा झाला. मात्र आमची प्रत्यक्ष भेट होण्याआधीच प्रकाशनाच्या अवघ्या महिन्याभरापूर्वीच त्यांचे कोल्हापुरात निधन झाले. त्यांचे निधन झाल्याची बातमी मिळताच मी रात्री कोल्हापूरला जाण्यासाठी महालक्ष्मी एक्सप्रेसने रवाना झालो. सकाळी ७ वाजता मला न्यायला कोल्हापूर स्टेशनवर डॉ. संभाजी बिरांजे आले. त्यांनी सुधीर पोवारांच्या निवासस्थानी नेले. अंत्यविधीची तयारी सुरु झाली. एव्हाना ४००-५०० जनसमुदाय जमला होता. दुपारी ११-१२ दरम्यान अंत्यविधी झाला. दुपारी डॉ. संभाजी बिरांजे यांनी मला आराम करण्यासाठी बुध्दविहारात पाठवून ते निघून गेले. रात्री परतीचा प्रवास करून मुंबईत परत आलो. सुधीर पोवारांच्या कार्याची माहिती लोकांना कळावी लेख लिहिण्यासाठी घेतला. मला अर्थातच त्यांच्याबद्दल सुरुवातीला जास्त माहिती नव्हती. लेख अपुरा वाटत होता. त्यामुळे तो सम्राटाला पाठवला नाही. तिसऱ्या-चौथ्या दिवशी उषा काळे यांचा सम्राटमध्ये सुधीर पोवारांवर लेख प्रसिद्ध झालेला बघून आनंद झाला. 

सुधीर बापुसो पोवार (शाक्यवीर)
जन्म : १५ सप्टेंबर १९४९
निधन : ६ ऑक्टोबर २०१५ 

ठरल्याप्रमाणे सुधीर पोवारांच्या पुस्तकाचे प्रकाशन पोवार कुटुंबिय व त्यांच्या मित्रमंडळींनी आयोजित करून कार्यक्रम पार पाडण्याचे निश्चित केले. कार्यक्रमाचा सर्व खर्च कोल्हापूरच्या मंडळींनी केला. मग आम्ही मुंबईची मंडळीही मागे न हटलो नाही. पुस्तका छपाईच्या नियमानुसार मी १००० प्रति न काढता मी केवळ २०० पुस्तके छापली होती. पोवार असताना आमचे मानधन वगैरे असे काही बोलणे झाले नव्हते. औपचारिकतेचा भाग म्हणून मी त्यातील ५० पुस्तके त्यांच्या मुलाला दिली.  १०-२० पुस्तके स्टेजवर वाटण्यात गेली. बाकीच्या प्रती कार्यक्रमाच्या दिवशी विकल्या. किरकोळ शिल्लक प्रती मित्रमंडळींना देण्यात गेल्या. यामुळे या पुस्तकामध्ये मला आर्थिक तोटा झाला. 

कार्यक्रम पत्रिका 

रमेश शिंदे हे प्रमुख वक्ते होतेया ग्रंथाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक विजय सुरवाडे यांच्या हस्ते झाले.  डॉ. संभाजी बिरांजे, विनय कांबळे, विजय सुरवाडे यांची भाषणे झाली. दत्तोबा पोवारांच्या सून, दत्तोबा पोवारांचे नातू यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. त्यांचा सत्कार करण्यात आला. 

डावीकडून अमोल पोवार, रंगराव पांडे, विजय सुरवाडे, विनय कांबळे, रमेश शिंदे, राजरत्न ठोसर,
डॉ. संभाजी बिरांजे आणि चंद्रकांत कुरणे 
  

दत्तोबा पोवार यांचे नातू यांचा सुधीर पोवारांचे चिरंजीव अमोल पोवार यांच्या हस्ते सत्कार


जेष्ठ आंबेडकरी साहित्य संग्राहक रमेश शिंदे यांचा डॉ. संभाजी बिरांजे यांच्या हस्ते सत्कार






प्रकाशन समारंभाला उपस्थित असलेला जनसमुदाय

प्रकाशनाचा कार्यक्रम संपल्यानंतर कोल्हापुरातील मंडळींनी आमच्यासोबत फोटो घेतले


खाली बसलेले डावीकडून संजय कांबळे, विजय सुरवाडे, राजरत्न ठोसर आणि रमेश शिंदे 

खाली बसलेले डावीकडून दुसरे चंद्रकांत कुरणे, विजय सुरवाडे, राजरत्न ठोसर आणि रमेश शिंदे, 
मागे उभे डावीकडून दुसरे डॉ. संभाजी बिरांजे 

दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या  

महाराष्ट्र टाइम्स १३ नोव्हेंबर २०१७



लोकमत १३ नोव्हेंबर २०१७


अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. संभाजी बिरांजे यांनी स्वखर्चाने आम्हाला कोल्हापूरमधील प्रेक्षणीय स्थळे - माणगांवला झालेल्या परिषदेचे ठिकाण, सोनतळी कॅम्प, खासबाग मैदान, दत्तोबा पोवारांचे कोल्हापुरातील निवासस्थान, दत्तोबा पोवारांची समाधी, सत्यवादी कार्यालय अशी ऐतिहासिक ठिकाणे आम्हाला मार्गदर्शन करत दाखवली.

काळाच्या पुढे कुणाचे काय चालणार! पण सुधीर पोवारांच्या अचानक जाण्याने माझे संशोधन कार्यातील बरेच नुकसान झाले. त्यांची मला अनेक प्रकारे भविष्यात मदत झाली असती. तसे त्यांनी वचनही दिले होते. पुढे त्याबाबतीत अनेक कटू अनुभव आले. आजपर्यंत पोवार कुटुंबियांनी सुद्धा आमची कधी साधी विचारपूसही केली नाही. दोन-तीन वेळा भेटण्याचा प्रयत्न केला असता ते भेटले नाहीत. त्यांनी भेट टाळली. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भेटून आपुलकी दाखवलेल्यांपैकी एकाही कार्यकर्त्याने आजवर कधी आमच्याकडे ढूंकून देखील पाहिले नाही किंवा साधा एक फोनही केला नाही. अनेकदा मागणी करूनही कार्यक्रमाचे फोटोसुद्धा देण्याचे सौजन्य कुणी दाखवले नाही. आम्हाला एकही कागद किंवा संदर्भ देण्यात कोणालाही अजिबात रस नाही.  असो! तीही माणसे आहेत. त्यांच्या दृष्टीने आम्ही योग्य माणसे नसावेत. 

जाता-जाता सुधीर पोवारांनी मला दोन मोलाची माणसं दिली. एक डॉ. संभाजी बिरांजे व दुसरे संजय कांबळे. डॉ. संभाजी बिरांजे मला संशोधन कार्यात मदत करत असतात, तर संजय कांबळे माझ्या प्रकाशनाची पुस्तके विक्री व्हावी म्हणून धडपडत असतात. हे दोघेही माझे घनिष्ठ मित्र मला अनेक प्रकारे मदत करताना धन्यता मानतात. 

- राजरत्न ठोसर (प्रकाशक) 
विनिमय पब्लिकेशन्स, विक्रोळी मुंबई

Comments

  1. संशोधनाबद्दल आंबेडकरी समाजात कमालीची अनास्था आणि उदासीनता आहे. अशा वृत्तीमुळेच चळवळीची अपरिमित हानी झाली आहे. अत्यंत माहितीपूर्ण आणि अंतर्मुख करणारा लेख.

    ReplyDelete
    Replies
    1. संशोधन कार्यात लोकांनी स्वतःहून पुढे यायला पाहिजे.

      Delete
  2. राज जयभीम.
    असे अनुभव पुष्कळ येतील. प्रत्येक अनुभव तुला शिकवून जाईल त्यामुळे तु नामोहरम होणार नाहीस कारण तुझे ध्येयचं फार मोठे व उदात्त आहे. या कार्याला मदत मिळत च राहील. मला खात्री आहे. तुझे स्वप्न साकार होणारच.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोटोबायोग्राफी २२ व्या खंडाच्या सुधारित आवृत्तीची समीक्षा

बाबासाहेबांची चळवळ समजून घेण्याकरिता वाचक आणि संशोधकांसाठी खास पर्वणी! - अमित इंदुरकर