Posts

Showing posts from August, 2020

बाबासाहेबांची चळवळ समजून घेण्याकरिता वाचक आणि संशोधकांसाठी खास पर्वणी! - अमित इंदुरकर

Image
युवा संपादकाचा स्तुत्य उपक्रम, जिंकणार वाचकांचे मन  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि चळवळीची अस्सल स्त्रोत साधने - खंड १  संपादक : राजरत्न ठोसर  पाने : ७२० ; किंमत : ५५० ; प्रकाशन : विनिमय पब्लिकेशन्स डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य म्हणजे त्यांच्या अनुयायांना जीव की प्राण. बाबासाहेब ६ डिसेंबर १९५६ ला आपल्या लाखो अनुयायांना सोडून गेले, परंतु त्यांचे विचार म्हणजेच त्यांचे साहित्य आजही त्यांच्या अनुयायांना मार्गदर्शन करीत आहे. आज वर्तमानकालीन परिस्थितीत अनेक आंबेडकर विरोधक म्हणतात की, जिवंत आंबेडकरांपेक्षा मृत आंबेडकर अधिक भयानक आहेत . (   Ambedkar   Dead  is More Dangerous Than Ambedkar Alive ) ते असे का म्हणत असावे? याचा अभ्यास करताना असे लक्षात येते की डॉ. बाबासाहेबांचे साहित्य हे मृत आंबेडकरांच्या अनुयायांना बौद्धिक आणि वैचारिक खाद्य पुरवून अन्याय व अत्याचाराविरोधात बंड करण्यास उद्युक्त करणारे आहे. प्रबोधनच्या अंकात प्रसिद्ध झालेली जाहिरात, पण तेव्हा डॉ. आंबेडकरांनी मूकनायक पत्र सोडून दिले होते.  बाबासाहेबांच्या महापरीनिर्वाणानंतर बाबासाहेबांचे विखुरलेले प्रकाशित तसेच अप्रकाशि