Posts

Showing posts from June, 2020

"डॉ. आंबेडकरांचे स्नेही दत्तोबा पोवार" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

Image
कोल्हापूरचे सुधीर पोवार यांनी "डॉ. आंबेडकरांचे स्नेही दत्तोबा पोवार" हा ग्रंथ लिहून पूर्ण केला होता. जेव्हा तो माझ्याकडे प्रकाशनासाठी आला तेव्हा आमच्यात बातचीत सुरु झाली. या पुस्तकाच्या पाचशे प्रति मी तुम्हाला खवपून देण्यास मदत करेन असे त्यांनी मला वचन दिले होते. डॉ. आंबेडकरांची आणि शाहू महाराजांची भेट दत्तोबा पोवार यांनीच कशी घडवून आणली, यावर सविस्तर चर्चा त्यांनी माझ्याशी केली.ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. (पण ही मैत्री अल्पशी ठरली.) ओळखी दरम्यान मी त्यांच्याकडून, "बाबांचे स्मरण"  म. भि. चिटणीसांची विमलकीर्ती यांनी घेतलेली मुलाखत लहान पुस्तिकेद्वारे प्रसिद्ध झाली होती, ती पुस्तिका आणि जनतेच्या एका विशेष अंकाची (ऑक्टोबर १९५४) मागणी केली होती. ते दोन्ही त्यांच्याकडे होते. त्यांनी ताबडतोब त्याच्या कॉपीज करून त्यांनी मला पाठवूनही दिल्या. विजय सुरवाडे आणि मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यंगचित्रांवर काम करत आहे, याची माहिती त्यांना दिली तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे असलेले दोन व्यंगचित्रे मला पाठवून दिली होती.  आंबेडकरकालीन नियतकालिकांवर मी काम करत असल्याची त्यां

"डॉ. आंबेडकरांचा सांगाती" - बळवंतराव वराळे या ग्रंथाच्या पुनर्प्रकाशनाच्या निमित्ताने

Image
बळवंतराव हणमंतराव वराळे  (१९०१-१९७७) बेळगावातील बेनाडी या गावी २ फेब्रुवारी १९०१ रोजी जन्म. १९२७ च्या महाड सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. मुंबई विधिमंडळाच्या निवडणुकीत (१९३७) स्वतंत्र मजूर पक्षातर्फे बेळगाव येथून ते निवडून आले. डॉ. आंबेडकरांनी १९४० साली स्थापिलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे ते धडाडीचे कार्यकर्ते होते. डॉ. आंबेडकरांशी त्यांचे अत्यंत घनिष्ठ व घरोब्याचे संबंध होते. औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयाचे ते पहिले रजिस्ट्रार होते. काठमांडू येथे भरलेल्या चौथ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत ते डॉ. आंबेडकर यांच्या समवेत सहभागी होते. १९७५-७७ या काळात ते पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. ९ ऑगस्ट १९७७ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.   दुसऱ्या आवृत्तीचे मुखपृष्ठ   प्रा. ल. बा. रायमाने यांनी सतत बळवंतराव ह. वराळेंचा पाठपुरावा करत "डॉ. आंबेडकरांचा सांगाती"च्या आठवणी वराळेंच्या तोंडून वदवून घेऊन त्या लिहून काढल्या. रायमाने यांनी सतत तगादा लावला नसता तर कदाचित या आठवणी आपल्यापर्यंत आज आल्या नसत्या. वराळेंनी सांगितलेल्या या आठवणी अत्यंत अचूक आहेत. वराळेंना डायरी लिहावयाची

डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोटोबायोग्राफी २२ व्या खंडाच्या सुधारित आवृत्तीची समीक्षा

Image
२१ डिसेंबर २०१६ रोजी नागपूर येथे सुधारित २२ व्या खंडाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल विद्यासागरराव यांच्या हस्ते झाले. या ग्रंथाची किंमत ५०० रु. आहे व त्याची पृष्ठसंख्या ४०० अधिक १८ आहे. मुखपृष्ठ देखणे असून ग्रंथाची बांधणी उत्तमच आहे. हा ग्रंथ शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई येथे छापला असल्याचा उल्लेख आहे. रचना व मांडणी शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचनालय, मुंबईला केलेली आहे. या ग्रंथाचा पेपर १८० ग्राम आर्ट पेपर असून ग्रंथाची संपूर्ण छपाई फोर कलर प्रिंटिंगची आहे व काही पाने वन कलर प्रिंटिंगवर छपाई केल्याची शक्यता वाटते. सुधारित आवृत्तीची तारीख १४ एप्रिल २०१६ जरी असली तरी प्रत्यक्षात हा ग्रंथ डिसेंबर २०१७ ला प्रकाशित झालेला असून विक्रीसाठी ८ जानेवारी २०१८ ला उपलब्ध झालेला आहे. प्रतींची छापील संख्या ५०,००० असा आकडा आहे.  सुधारित आवृत्ती समितीमध्ये प्रा. अविनाश डोळस, प्रा. दत्ता भगत, डॉ. ताराचंद्र खांडेकर, सचिन तासगावकर, रमेश शिंदे यांचे नाव आहे. ग्रंथाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा शुभसंदेश आहे. त