"डॉ. आंबेडकरांचे स्नेही दत्तोबा पोवार" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
कोल्हापूरचे सुधीर पोवार यांनी "डॉ. आंबेडकरांचे स्नेही दत्तोबा पोवार" हा ग्रंथ लिहून पूर्ण केला होता. जेव्हा तो माझ्याकडे प्रकाशनासाठी आला तेव्हा आमच्यात बातचीत सुरु झाली. या पुस्तकाच्या पाचशे प्रति मी तुम्हाला खवपून देण्यास मदत करेन असे त्यांनी मला वचन दिले होते. डॉ. आंबेडकरांची आणि शाहू महाराजांची भेट दत्तोबा पोवार यांनीच कशी घडवून आणली, यावर सविस्तर चर्चा त्यांनी माझ्याशी केली.ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. (पण ही मैत्री अल्पशी ठरली.) ओळखी दरम्यान मी त्यांच्याकडून, "बाबांचे स्मरण" म. भि. चिटणीसांची विमलकीर्ती यांनी घेतलेली मुलाखत लहान पुस्तिकेद्वारे प्रसिद्ध झाली होती, ती पुस्तिका आणि जनतेच्या एका विशेष अंकाची (ऑक्टोबर १९५४) मागणी केली होती. ते दोन्ही त्यांच्याकडे होते. त्यांनी ताबडतोब त्याच्या कॉपीज करून त्यांनी मला पाठवूनही दिल्या. विजय सुरवाडे आणि मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यंगचित्रांवर काम करत आहे, याची माहिती त्यांना दिली तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे असलेले दोन व्यंगचित्रे मला पाठवून दिली होती. आंबेडकरकालीन नियतकालिकांवर मी काम...